आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे अग्रस्थान कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 00:48 IST2018-05-02T00:48:59+5:302018-05-02T00:48:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India retained the top position in the ICC Test rankings | आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे अग्रस्थान कायम

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे अग्रस्थान कायम

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. उल्लेखनीय म्हणजेयावेळी क्रमवारीत मोठे बदल झाल्यानंतरही भारताने अव्वल स्थान राखले. परिषदेने २०१५-१६ आणि २०१६-१७ या दरम्यानच्या निकालाच्या आधारावर ही क्रमवारी तयार केली आहे.
दुसऱ्या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेवर १३ गुणांनी आघाडी घेत भारताने पहिले स्थान काबीज केले असून भारताचे सर्वाधिक १२५ गुण आहेत. द. आफ्रिका ११२ गुणांवर तर आॅस्ट्रेलिया १०६ गुणांसह तिसºया स्थानी आहे. न्यूझीलंड १०२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर असून इंग्लंड पाचव्या व श्रीलंका सहाव्या स्थानी आहे. पाकिस्तान सातव्या क्रमांकावर कायम आहे. विशेष म्हणजे बांगलादेशने आठव्या स्थानी झेप घेतली असून वेस्ट इंडिज पहिल्यांदाच नवव्या स्थानी घसरले आहेत.

Web Title: India retained the top position in the ICC Test rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.