IND vs AUS 2nd ODI India Probable Playing 11 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडच्या ओवल स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. २३ ऑक्टोबरला होणारा हा सामना भारतासाठी मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी महत्त्वाचा असेल. या सामन्यात कोच गौतम गंभीर आपल्या ताफ्यातील हुकमी एक्का काढून ऑस्ट्रेलियासमोर आव्हान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असेल. कोण आहे तो हुकमी एक्का आणि हा डाव गंभीरसाठी मास्टर स्टोक कसा ठरेल? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संधी मिळाली की, तो त्या संधीचं सोनं करुन दाखवतो
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी अष्टपैलूच्या रुपात मैदानात उतरण्याला पसंती दिली. पण दुसऱ्या आणि महत्त्वपूर्ण सामन्यात ३० वर्षीय प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव याला पसंती मिळू शकते. कुलदीप यादवला ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्यावेळी त्याने सोनं करून दाखवलं आहे. दुसऱ्या सामन्यात त्याच्यावर डाव खेळला तर तो टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो.
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
कांगारूंना जाळ्यात अडकवण्यासाठी टीम इंडियाकडील हा सर्वोत्तम पर्याय
कुलदीप यादवनं आतापर्यंत ११३ सामन्यातील ११० डावात १८१ विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या वर्षात ७ वनडेत त्याच्या खात्यात ९ विकेट्स जमा आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत कुलदीप यादवनं फक्त ३ सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत. पण सध्याच्या घडीचा त्याता फॉर्म आणि अनुभव टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चायनामन गोलंदाजाची फिरकी अडचणीत आणू शकते. त्यामुळे कोच गौतम गंभीर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी या भिडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकतो.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध कशी असेल भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन?
रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज.