Join us  

ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान भिडणार...

पाकिस्तानविरुद्ध भिडण्यासाठी बीसीसीआय परवानगी देणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 4:44 PM

Open in App

मुंबई : पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान कसे भिडू शकतात, याचा विचार आयसीसी करताना दिसत आहे. पण पाकिस्तानविरुद्ध भिडण्यासाठी बीसीसीआय परवानगी देणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

ट्वेन्टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक यापूर्वीच आयसीसीने जाहीर केले आहे. पण या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान साखळी फेरीत तरी आमने-सामने यातेना दिसत नाहीत. पण जर ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येत नसतील तर त्यांच्यामध्ये सराव सामना खेळवण्यात यावा, असा विचार आयसीसी करताना दिसत आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये, अशी लाट देशामध्ये उठली होती. पण इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 जूनला सामना झाला होता. या सामन्याचा चाहत्यांनी सर्वाधिक पसंती दिली होती. हा सामना भारताने सहजपणे जिंकला होता. आता ट्वेन्टी-20 विश्वचषकातही या दोन देशांमध्ये लढत व्हावी, अशी आयसीसीची इच्छा आहे.

आयसीसीने आपल्या एका बैठकीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सामना खेळवावा, यावर एकमत झाले आहे. पण आयसीसीने ही गोष्ट अजूनही बीसीसीआयला कळवलेली नाही. आता बीसीसीआयच्या कोर्टात हा चेंडू आल्यावर ते काय निर्णय घेतात, यावर या सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चौथा सराव सामना खेळण्याचे आयसीसीने ठरवल्याचे म्हटले जात आहे. हा सामना 16 फेब्रुवारीला ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. पण हा सामना दोन्ही देशांच्या महिलांमध्ये होणार असल्याचे समजते.

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांचे संबंध पाहता उभय देशांत द्विदेशीय क्रिकेट मालिका होणे, अश्यकच. 2013नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका झालेलीच नाही. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) आणि आशिया चषक स्पर्धेत हे संघ एकमेकांना भिडतात. पण, भारत - पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिकेसंदर्भात बीसीसीआयच्या प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी मोठं विधान केलं आहे.

फेब्रुवारी 2019ला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी झाली होती. पण, हा सामना झाला. बर्मिंगहॅम येथील एडबस्टन स्टेडियमवर कडक सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या या सामन्यात भारतानं डकवर्थ लुइस नियमानुसार 89 धावांनी विजय मिळवला.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतपाकिस्तानटी-२० क्रिकेट