भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...

India vs. Pakistan, Vaibhav Suryawanshi: भारत-पाक 'यंगस्टर्स'चा महासंग्राम! ACC आशिया चषक स्पर्धेत टीम इंडिया 'ए'ची खराब सुरुवात; IPL स्टार्सवरही पाकिस्तानच्या युवा गोलंदाजांचे वर्चस्व, ८ फलंदाज गारद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 21:44 IST2025-11-16T21:43:51+5:302025-11-16T21:44:42+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India-Pakistan high-voltage match! Vaibhav Suryavanshi's team was defeated; 8 wickets in a row, only so many runs scored... | भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...

भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...

एसीसी मेन्स आशिया कप 'रायझिंग स्टार्स'क्रिकेट स्पर्धेत आज भारत 'ए' आणि पाकिस्तान 'शाहीन्स' यांच्यात सुरू असलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानच्या धारदार गोलंदाजीसमोर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. 

ताजी माहिती हाती येईपर्यंत भारतीय संघाने आपले महत्त्वाचे ८ फलंदाज गमावले आहेत. या संघात आयपीएलमध्ये चमक दाखवणारे जितेश शर्मा आणि रमनदीप सिंह (Ramandeep Singh) यांसारखे खेळाडू असूनही, पाकिस्तानच्या युवा गोलंदाजांनी त्यांच्यावर सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला. प्रियांश आर्य आणि वैभव सूर्यवंशी यांनी डावाची सुरुवात केली. चौथ्या षटकात आर्य १० धावांवर बाद झाला. पाच षटकांनंतर भारताची धावसंख्या ४०-१ होती. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि नमन धीर यांनी डाव सावरला. परंतू, नवव्या षटकात भारताला दुसरा धक्का बसला जेव्हा नमन धीर २० चेंडूत ३५ धावांवर बाद झाला. दहाव्या षटकात वैभव सूर्यवंशी बाद झाला. त्याने २८ चेंडूत ४५ धावा केल्या होत्या. यामध्ये पाच चौकार आणि तीन षटकार होते. त्यानंतर १३ व्या आणि १४ व्या षटकात भारताला दोन धक्के बसले. प्रथम जितेश शर्मा पाच धावांवर बाद झाला, त्यानंतर १४ व्या षटकात आशुतोष. १५ व्या षटकात नेहल वधेरा आठ धावांवर बाद झाला. 

भारतीय संघ १३६ धावांवर सर्वबाद झाला आहे. पाकिस्तानसमोर २० षटकांत १३७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे. 

सूर्यवंशीच्या कामगिरीवर लक्ष:

या सामन्यात बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याच्यावर विशेष लक्ष होते. त्याने यापूर्वीच्या सामन्यात यूएईविरुद्ध १४४ धावांची धडाकेबाज खेळी केली होती, तसेच टी-२० मध्ये ३५ हून कमी चेंडूंमध्ये दोन शतके ठोकण्याचा अनोखा विक्रमही त्याच्या नावावर आहे. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताच्या प्रमुख फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही.

नसीम शाहचा भाऊ मैदानात

पाकिस्तान 'शाहीन्स'च्या संघात युवा वेगवान गोलंदाज उबैद शाहचा समावेश आहे, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जलदगती गोलंदाज नसीम शाहचा लहान भाऊ आहे. या स्पर्धेत भारताने आपला पहिला सामना यूएईला १४८ धावांनी हरवून जिंकला होता, परंतु आजच्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.


 

Web Title : भारत बनाम पाकिस्तान: सूर्यवंशी विफल, हाई-वोल्टेज मैच में भारत का पतन।

Web Summary : 'राइजिंग स्टार्स' एशिया कप में पाकिस्तान के खिलाफ भारत की बल्लेबाजी चरमरा गई। शीर्ष क्रम विफल, सूर्यवंशी के 45 रन सर्वाधिक। पाकिस्तान के उबैद शाह, नसीम शाह के भाई, चमके। भारत के आठ विकेट गिरे।

Web Title : India vs Pakistan: Suryavanshi fails, India collapses in high-voltage match.

Web Summary : India's batting crumbled against Pakistan in the 'Rising Stars' Asia Cup. Top order failed, with Suryavanshi's 45 runs the highest. Pakistan's Ubaid Shah, Naseem Shah's brother, shines. India's eight wickets down.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.