Join us  

बीसीसीआयची नामुष्की, Asia XI vs World XI सामन्याचे यजमानपद भूषविणार नाही, जाणून घ्या कारण

अहमदाबाद येथे तयार होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर Asia XI vs World XI या लढतीचे आयोजन करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) कंबर कसली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 11:06 AM

Open in App

अहमदाबाद येथे तयार होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर Asia XI vs World XI या लढतीचे आयोजन करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) कंबर कसली होती. पण, मार्चमध्ये होणाऱ्या या सामन्याच्या यजमानपदावरून बीसीसीआयनं माघार घेतल्याचा निर्णय अध्यक्ष सौरव गांगुलीनं घेतला आहे. मार्चपर्यंत स्टेडियमचं काम पूर्ण होणार नसल्यानं गांगुलीनं हा निर्णय घेतला आहे. Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामने होणार होते. त्यापैकी एक सामना हा बांगलादेश येथील मिरपूर येथे होणार आहे. पण, आता बीसीसीआयनं माघार घेतल्यामुळे दुसरा सामनाही मिरपूरमध्येच खेळवण्यात येईल.

अहमदाबाद येथे सरदार पटेल स्टेडियम उभारले जात आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अशी याची ओळख होत आहे आणि Asia XI vs World XI यांच्यातील सामन्यानं या स्टेडियमचं उद्धाटन होणार होते. पण, आता ते शक्य नाही, कारण स्टेडियमचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही.  या सामन्यात आशिया एकदाश संघाचे प्रतिनिधित्व पाच भारतीय खेळाडू करणे अपेक्षित आहे. याशिवाय वर्ल्ड एकादश संघात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड,  वेस्ट इंडिया देशाचे खेळाडू खेळणार आहेत.

इतिहासाचा साक्षीदार सरदार पटेल स्टेडियम...लिटल मास्टर सुनील गावसकर यांची 10 हजारावी कसोटी धावा, माजी कर्णधार कपिल देवचे विक्रमी 432 बळी आणि त्याचबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे कसोटीतील पहिले द्विशतक अशा अनेक विक्रमांचा सरदार पटेल स्टेडियम साक्षीदार  आहे. 

सरदार पटेल स्टेडियममध्ये 1938 ते 2014 दरम्यान 12 कसोटी आणि 24 वन डे सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. साबरमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे स्टेडियम अनेक विक्रमांचे साक्षीदार ठरले आहे. याच मैदानावर गावस्कर 1987 मध्ये 10 हजार कसोटी धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनला होता. तसेच कपिलने 1994 मध्ये न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीचा 431 कसोटी बळींचा त्यावेळेसचा विश्वविक्रमही मोडीत काढला होता.

याच स्टेडियमवर 2011 वर्ल्डकपचा दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवण्यात आला होता. त्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला होता. सचिनने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक याच मैदानावर केले होते. सचिनने येथे ऑक्टोबर 1999 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 217 धावांची खेळी केली होती.

टॅग्स :बीसीसीआयसौरभ गांगुली