आशियाई स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात गोल्डन मॅच?; भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर

Asian Games 2023 : चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेत भारताचा पुरुष व महिला संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय बीसीसीआयने घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 05:53 PM2023-07-28T17:53:12+5:302023-07-28T17:54:23+5:30

whatsapp join usJoin us
India may face Pakistan in Finals, Indian cricket Team's schedule in Asian Games 2023; Asian Games 2023 will have International status this time | आशियाई स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात गोल्डन मॅच?; भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर

आशियाई स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात गोल्डन मॅच?; भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asian Games 2023 : चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेत भारताचा पुरुष व महिला संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय बीसीसीआयने घेतला आणि ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली पुरुष संघात दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी दिली. या स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात १८ संघ सहभागी होणार आहेत, परंतु भारतीय संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळायचे आहे. त्यामुळे फक्त ३ सामने जिंकून भारत सुवर्णपदक जिंकू शकणार आहे आणि India vs Pakistan यांच्यात सुवर्णपदकाची म्हणजेच गोल्डन मॅच होण्याची शक्यता आहे. 

२३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत चीनमध्ये आशियाई स्पर्धा होणार आहे. बीसीसीआयने त्यासाठी १५ सदस्य आणि ५ राखीव खेळाडू अशा २० खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. भारतीय संघ या स्पर्धेत अव्वल मानांकित म्हणून दाखल होणार आहे आणि त्यामुळे त्यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीनुसार संघांना मानांकन दिली जाणार आहेत. 


५ ऑक्टोबर - उपांत्यपूर्व फेरी
६ ऑक्टोबर - उपांत्य फेरी
७ ऑक्टोबर - फायनल ( जर पात्र ठरल्यास )  

२०१० व २०१४च्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट खेळलं गेलं, परंतु बीसीसीआयने संघ पाठवणे गरजेचे नाही समजलं.  जकार्ता येथे २०१८ साली पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट बाद करण्यात आले होते. आतापर्यंत दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला असताना पुरुषांमध्ये एकदा श्रीलंका आणि एकदा बांगलादेशने सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, महिलांमध्ये पाकिस्तानने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे.

 
भारताचा पुरूष संघ - ऋतुराज गायकवाड ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग ( यष्टिरक्षक); राखीव - यश ठाकूर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन
 

Web Title: India may face Pakistan in Finals, Indian cricket Team's schedule in Asian Games 2023; Asian Games 2023 will have International status this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.