Join us  

India vs England : टीम इंडियाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव अन् रद्द करावी लागली पाचवी कसोटी; आता ती होणार या तारखेला!

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियानं कसोटी मालिकेत यजमानांचे वस्त्रहरण केले. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं २-१ अशी आघाडी घेतली आणि पाचवी कसोटी जिंकून १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा निर्धार होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 1:48 PM

Open in App

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियानं कसोटी मालिकेत यजमानांचे वस्त्रहरण केले. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं २-१ अशी आघाडी घेतली आणि पाचवी कसोटी जिंकून १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा निर्धार होता. पण, मँचेस्टर कसोटीच्या आदल्या दिवशी फिजिओ योगेर परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् सामनाच रद्द करावा लागला. त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी खेळाडू यूएईत दाखल होत आहे. पण, कसोटीचा नेमका निकाल काय?; २-१, २-२ की ३-१ याबाबत चर्चा सुरू आहे. त्यात पाचवी कसोटी कधी होणार, याबाबतही चाहते उत्सुक आहेत. पाचव्या कसोटीबाबत नवीन अपडेट्स आले आहेत. 

इंग्लंडनं नुकतंच त्यांचे २०२२च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार टीम इंडिया वन डे व ट्वेंटी-२० मालिका खेळण्यासाठी पुढील वर्षी लंडनमध्ये दाखल होणार आहे.  तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या या मालिकेत आता एका कसोटी सामन्याचा समावेश केला जाऊ शकतो. १ जुलै ते १४ जुलै या कालावधीत टीम इंडिया येथे तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळेल. त्यानंतर १९ जुलै ते १२ सप्टेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे, तीन ट्वेंटी-२० व  तीन कसोटी सामन्यांची मालिका होईल.  आता एका कसोटी सामन्याच्या समावेशानंतर दक्षिण आफ्रिका दोऱ्याच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. ( India will be playing a Test match in England next year which will be associated to the 2021 Test series and will decide the results of the series) 

जाणून घ्या भारत-इंग्लंड मर्यादित षटकांच्या मालिकेचे वेळापत्रक!( England Men v India Series schedule, 2022) 

ट्वेंटी-२० मालिका१ जुलै २०२२ - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर३ जुलै २०२२ - ट्रेंट ब्रिज, नॉटिंग्हॅम६ जुलै २०२२ - एजीस बाऊल, साऊदहॅम्प्टन वन डे मालिका  ९ जुलै २०२२ - एडबस्टन, बर्मिंगहॅम१२ जुलै २०२२ - ओव्हल, लंडन१४ जुलै २०२२ - लॉर्ड्स, लंडन  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ
Open in App