दुबई: कर्णधार विराट कोहली आणि टीम इंडियाने गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. भारताने कसोटी मालिकेत आठव्या स्थानावरील विंडीजला २-० ने पराभूत केले. त्यामुळे भारताचे ११६ तर दुसऱ्या स्थानावरील द.आफ्रिकेचे १०६ गुण आहेत. कोहली ९३५ गुणांसह आॅस्ट्रेलियाचा निलंबित खेळाडू स्टीव्ह स्मिथपेक्षा (९१०) २५ गुणांनी पुढे आहे. तर चेतेश्वर पुजारा ७६५ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.