Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय खेळाडूंचा फिटनेस अन् फॉर्मही खराब, पाकिस्तानच जिंकणार; वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा दावा

ICC ODI World Cup 2023 : २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होताच सर्वांचे लक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan) या बहुप्रतिक्षित लढतीकडे लागले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 17:42 IST

Open in App

ICC ODI World Cup 2023 : २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होताच सर्वांचे लक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan) या बहुप्रतिक्षित लढतीकडे लागले होते. जगभरातील चाहते दोन आशियाई हेव्हीवेट्स संघांची टक्कर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या तज्ञांनी त्यांचे विश्लेषण सुरू केले आहे की प्रत्यक्ष सामन्यात कोणता संघ बाजी मारेल.पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि १९९२ चा वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य आकिब जावेद यानेही मत मांडले आहे आणि सांगितले आहे की भारतापेक्षा अधिक संतुलित बाजू असल्याने पाकिस्तानचा संघ जिंकेल.  

"मला वाटते की पाकिस्तानचा संघ संतुलित आहे आणि खेळाडूंच्या वयाचा आलेख खूपच चांगला आहे. भारत त्या टप्प्यावर आहे जिथे त्यांच्याकडे मोठी नावे आहेत, परंतु त्यांचा फिटनेस आणि फॉर्म योग्य नाही. त्यांना संघर्ष करावा लागेल आणि त्यांना नवीन खेळाडू शोधावे लागत आहेत. मला वाटते की पाकिस्तानला भारतात भारताला पराभूत करण्याची मोठी संधी आहे,” असे जावेदने सांगितले. 

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने ७ सामन्यांत पाकिस्तानला पराभूत केले आहे आणि एकदाही पराभव पत्करलेला नाही. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २०२१ मध्ये भारताची अपराजित मालिका बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघाने खंडीत केली होती. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.   वर्ल्ड कप स्पर्धेतील ९ सामन्यांचे सुधारित वेळापत्रक n १० ऑक्टोबर - इंग्लंड वि. बांगलादेश ( १०.३० वा. पासून सुरु. आधी दुपारी २ वाजल्यापासून)n १० ऑक्टोबर - पाकिस्तान वि. श्रीलंका ( २ वा. पासून) (आधी १२ ऑक्टोबर)n १२ ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका ( २ वा. पासून) (आधी १३ ऑक्टोबर)n १३ ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. बांगलादेश ( २ वा. पासून) (आधी १४ ऑक्टोबर)n १४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान ( २ वा. पासून) (आधी १५ ऑक्टोबर)n १५ ऑक्टोबर - इंग्लंड वि. अफगाणिस्तान ( २ वा. पासून) (आधी, १४ ऑक्टोबर)n ११ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश ( १०.३० वा. पासून) (आधी १२ नोव्हेंबर)n ११ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान ( २ वा.पासून) (आधी १२ नोव्हेंबर)n १२ नोव्हेंबर - भारत वि. नेदरलँड्स ( २ वा. पासून) (आधी ११ नोव्हेंबर)

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App