Join us

खेळाडूंना पारखण्याची भारताकडे अंतिम संधी

विशाखापट्टणम : इंग्लंडमध्ये आगामी ३० मेपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्याआधी काही गुणवान खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी भारत आॅस्ट्रेलियाविरुद्ध ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 05:37 IST

Open in App

विशाखापट्टणम : इंग्लंडमध्ये आगामी ३० मेपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्याआधी काही गुणवान खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी भारत आॅस्ट्रेलियाविरुद्ध रविवारपासून दोन सामन्यांची टी२० मालिका खेळेल. चमकदार कामगिरी करणाऱ्यांचा विचार राष्टÑीय संघासाठी होऊ शकतो.

विश्वचषकाआधी भारताची ही अखेरची मालिका असेल. कर्णधार कोहली ३ आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मैदानावर परतला. याशिवाय संघात प्रबळ दावेदार म्हणून गणलेले विजय शंकर तसेच ऋषभ पंत यांच्याकडे नजरा असतील. पाठीच्या दुखण्यामुळे बाहेर झालेल्या हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत विजय शंकरलाही संधी असेल. टी२०त मात्र कार्तिक खेळेल.

स्टार जसप्रीत बुमराह परतल्याने गोलंदाजीला धार आली. टी२० मध्ये ५० बळींचा टप्पा गाठण्यासाठी त्याला २ बळींची गरज आहे. याशिवाय लेगब्रेक गोलंदाज मयांक मार्कंडेयला युझवेंद्र चहल व कृणाल पांड्यासह त्याला स्थान मिळू शकते.टी२०मध्ये भारताच्या कमागिरीत सातत्य दिसले नाही. न्यूझीलंडविरुद्ध भारताने १-२ ने मालिका गमावली. आॅसीविरुद्ध मात्र टी२० विजयाचा भारताचा रेकॉर्ड ११-६ आहे. २०१६ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने ३-० असा फडशा पाडला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :भारत