Join us  

टीम इंडियानं घाबरू नये, चौथ्या कसोटीसाठी 'Fair Pitch' तयार करावे; शोएब अख्तरचा सल्ला

India of not preparing a 'fair pitch' against England . अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) खेळवण्यात आलेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्याच्या निकालानंतर खेळपट्टीवर टीका होत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: March 02, 2021 11:24 AM

Open in App

भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) खेळवण्यात आलेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्याच्या निकालानंतर खेळपट्टीवर टीका होत आहे. खेळपट्टीवरून अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली आणि त्यात आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याचाही समावेश झाला आहे. भारतीय संघानं घाबरण्याची गरज नाही आणि चौथ्या कसोटीसाठी 'fair pitch' तयार करावे, असा सल्ला त्यानं दिला आहे. ( India of not preparing a 'fair pitch' against England )  रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह प्रमुख खेळाडू वन डे मालिकेत नाही खेळणार?; थेट IPL 2021 त भेटणार

अहमदाबाद कसोटी दोन दिवसांत संपल्यानंतर प्रत्येकजण खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करत आहे. या खेळपट्टीवर ३० विकेट्सपैकी २८ बळी हे फिरकी गोलंदांजी घेतल्या. आश्चर्याची बाब म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं ८ धावांत ५ विकेट्स घेत इंडियाला धक्के दिले. भारतानं हा सामना १० विकेट्स राखून जिंकला. अख्तरनं त्याच्या यूट्युब चॅनेलवर मत मांडताना टीम इंडियाला चौथ्या कसोटीत इंग्लंडचा सामना करताना घाबरण्याची गरज नाही, त्यांनी योग्य खेळपट्टी तयार करुन मैदानावर उतरावे, असा सल्ला दिला. Ravi Shastri : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस; म्हणाले...

तो म्हणाला,''अशा खेळपट्टीवर कसोटी मॅच खेळवली गेली पाहिजे?, अजिबात नाही. त्या खेळपट्टीवर प्रमाणापेक्षा जास्त फिरकी होत होती, त्यामुळे तो सामना दोन दिवसांत संपला. कसोटी क्रिकेटसाठी हे चांगलं नाही. घरच्या मैदानाचा फायदा मिळायलाच हवाच, परंतु त्याचा अतिरेक नसावा. भारतानं ४०० धावा केल्या असत्या आणि इंग्लंड २०० धावांवर बाद झाला असता, तर इंग्लंडचा संघ खराब खेळला असं आपण म्हटलं असतं. पण, इथे भारतीय संघही १४५ धावांत गारद झाला.''   विराट कोहलीनं रचला इतिहास; सचिन तेंडुलकरलाच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडलं मागेटीम इंडियानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली, त्यामुळे त्यांना घरच्या मैदानावर खेळताना घाबरण्याची आणि अशा प्रकारची खेळपट्टी तयार करण्याचीही गरज नाही, असेही अख्तर म्हणाला. ''भारतीय संघ तगडा आहे. फेअर प्ले आणि फेअर पिच तयार करूनही टीम इंडिया इंग्लंडला पराभूत करू शकते. तुम्ही प्रामाणिक खेळ करा,''असेही तो म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशोएब अख्तरअहमदाबादनरेंद्र मोदी स्टेडियम