Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैभव सूर्यवंशी नशिबाच्या जोरावर चमकणारा 'हिरा'? IPL 2026 आधी भारताच्या माजी दिग्गजाचे मोठं वक्तव्य

वैभव सूर्यवंशी हा चांगला फलंदाज, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 16:25 IST

Open in App

वैभव सूर्यवंशी IPL २०२६ च्या हंगामात पुन्हा एकदा मोठा धमाका करण्यासाठी सज्ज असेल. गत हंगामत विक्रमी शतक झळकावल्यापासून त्याने प्रत्येक स्पर्धा गाजवत आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. आता दुसऱ्यांदा IPL खेळताना तो पूर्वीच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. पण यंदाच्या हंगामाआधी माजी क्रिकेटरनं त्याच्या फलंदाजी कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत मोठं वक्तव्य केले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वैभव सूर्यवंशी हा चांगला फलंदाज, पण...

वैभव सूर्यवंशी एक चांगला फलंदाज असला तरी सध्याच्या घडीला तो नशिबाच्या जोरावर फलंदाजी करतो असे वाटते.आगामी आयपीएल हंगामापूर्वी वैभवच्या आक्रमक फलंदाजीबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने वैभवचं कौतुक करत तो उत्कृष्ट खेळाडू असल्याचं म्हटलं, पण तो याच तंत्रासह खेळत राहिला तर यशाचा मंत्र जपणं त्याला साध्य होणरा नाही, असे स्पष्ट मत रॉबिन उथप्पाने मांडले आहे. जर तसं झालं नाही तर या हंगामता तो धमक दाखवू शकणार नाही, असे माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाने म्हटले आहे. आयपीएल २०२५ च्या  हंगामात वैभव सूर्यवंशी याने वयाच्या १४ व्या वर्षी राजस्थान रॉयल्स संघाकडून पदार्पण केले होते. 

"जा माहिकासारखं नशीब घेऊन ये..." हार्दिक पांड्याच्या गर्लफ्रेंडचा Attitude दाखवणारी पोस्ट चर्चेत

 उथप्पा नेमकं काय म्हणाला?

जिओस्टारशी बोलताना उथप्पा म्हणाला की, "मी वैभवला खूप जवळून पाहिलं आहे. तो प्रतिभावंत खेळाडू आहे. पण त्याची फलंदाजी पाहिली तर त्यात बरंच काही नशिबावर अवलंबून असल्यासारखं वाटतं. क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्तरावर फक्त नशिबाच्या जोरावर जास्त काळ टिकणं कठीण असतं. गोलंदाजांना तुमच्या कमकुवत जागा माहिती असतात. त्यामुळे या हंगामात वैभवला खूप काही शिकायला मिळेल. तो धावा करेल, पण गेल्या वर्षीसारखी फॉर्म कायम ठेवणं कठीण जाऊ शकतं.”

मागील हंगामातील कामगिरी

मागील आयपीएलमध्ये वैभवला सर्व सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तो फक्त ७ सामने खेळू शकला होता, मात्र त्यातूनच त्याने २५२ धावा केल्या. त्याच्या सध्याच्या फॉर्मकडे पाहता आयपीएल २०२६ च्या हंगामात तो मोठा धमाका करेल, अशी अपेक्षा आहे. पण उथप्पाने त्याच्यासंदर्भात वेगळीच भविष्यवाणी केली आहे. वैभव सूर्यवंशी दमदार फलंदाडी करत ही गोष्ट खोटी ठरवणार का? ते पाहण्याजोगे असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Suryavanshi: Luck or talent? Ex-cricketer's big statement before IPL 2026.

Web Summary : Vaibhav Suryavanshi's IPL performance is under scrutiny. Robin Uthappa believes Suryavanshi relies too much on luck. While talented, Uthappa warns that sustained success requires more than just fortune. He predicts a challenging season for Suryavanshi if he doesn't adapt his approach.
टॅग्स :आयपीएल २०२६आयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगवैभव सूर्यवंशीराजस्थान रॉयल्स