'...तिला राजकन्येप्रमाणे जपेन'- के.एल राहुल

तिला मी राजकन्येप्रमाणे ठेवीन.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 11:57 IST2018-06-02T11:57:15+5:302018-06-02T11:57:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India cricketer kl rahul said about his relationship with bollywood actress nidhhi agerwal | '...तिला राजकन्येप्रमाणे जपेन'- के.एल राहुल

'...तिला राजकन्येप्रमाणे जपेन'- के.एल राहुल

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा क्रिकेटर के.एल राहुल व अभिनेत्री निधी अग्रवाल या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा आहे. के.एल राहुल व निधी अग्रवाल एका हॉटेलमध्ये डिनरला गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हापासून या दोघांच्या रिलेशनशीपची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी राहुल व मी चांगले मित्र असल्याचं स्पष्टीकरण निधी अग्रवालने दिलं होतं.

दरम्यान, आता निधीबरोबरच्या रिलेशनशीपवर के.एल राहुलनेही स्पष्टीकरण दिलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुलने निधीबरोबरच्या रिलेशनच्या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं. 'माझ्या रिलेशनची माहिती मीडियापासून लपवणार नाही. मला जी मुलगी आवडेल तिला मी राजकन्येप्रमाणे ठेवीन. रिलेशनशीपची गोष्ट लपून ठेवण्यासारखी नाही. निधी व मी एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो. डिनरला फक्त आम्ही दोघंच नव्हतं तर आमचे बंगळुरूतील काही मित्रही होते, असं के.एल राहुलने म्हटलं. 

'एक मुलगा व मुलगी मित्र असून शकत नाही का? निधी माझी चांगली मैत्रिण आहे. जेव्हा मी क्रिकेटर नव्हतो व निधी अभिनेत्री नव्हती तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखत आहे. आम्हाला जेव्हा संधी मिळते तेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो, असंही तो म्हणाला. 
 

Web Title: India cricketer kl rahul said about his relationship with bollywood actress nidhhi agerwal