Join us

भारतीय संघ सरावाला लागला, विराट कोहली अजून नाही पोहोचला; नेमका कुठे राहिला?

IND vs WI Series : १२ जुलैला पहिली कसोटी खेळवली जाणार आहे आणि भारतीय संघ आजपासून बार्बाडोस येथे सरावाला सुरूवात करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 11:41 IST

Open in App

IND vs WI Series : भारतीय खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यावर टप्प्याटप्प्याने पोहोचले आहेत. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, केएस भरत यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून कॅरेबियन पोहोचल्याचे अपडेट्स दिले आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर भारतीय खेळाडू महिनाभराच्या सुट्टीवर होते आणि आता ते WTC 2023-25 च्या पुढच्या हंगामाची सुरूवात विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून करणार आहे. १२ जुलैला पहिली कसोटी खेळवली जाणार आहे आणि भारतीय संघ आजपासून बार्बाडोस येथे सरावाला सुरूवात करणार आहे. पण, अजूनही स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) कॅरेबियन बेटावर पोहोचलेला नाही. पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघ दोन सराव सामनेही खेळणार आहे.  

३ जुलैपर्यंत सुट्टी संपवून बार्बाडोस येथे दाखल होण्याच्या सूचना बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना दिल्या होत्या. भारताचा कर्णधार रोहित शर्मा युरोप ट्रीप पूर्ण करून शनिवारीच बार्बाडोस येथे दाखल झाला. पण, विराट कोहलीला आणखी एक दिवस लागणार आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार विराट मंगळवारी बार्बाडोस येथे दाखल होईल. वेस्ट इंडिज संघानेही सराव सुरू केला आहे. विंडीज बोर्डाने १८ सदस्यीय संघाची निवड केली आहे.  

भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी  

IND vs WI Scheduleकसोटी मालिकापहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) 

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहली
Open in App