Join us
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff: विराट कोहली, रोहित शर्मासह क्रीडा विश्वानं शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

युवराज सिंग, इरफान पठाण, मोहम्मद कैफ यांनीही भारतीय जवानांना केलं सलाम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 11:12 IST

Open in App

भारत आणि चीन सैनिकांमध्ये १५ आणि १६ जून रोज गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. या परिसरात तैनात असलेले  जवान जखमी झाले आहेत. त्यातील २० जणांन शहीद झाले. भारतीय लष्कर देशाच्या अखंडतेसाठी आणि संरक्षणासाठी कटीबद्ध आहे अशी प्रतिक्रिया भारतीय लष्काराने दिली आहे. भारतीय सूत्रांनुसार चीनच्या ४३ सैनिकांपैकी काहींचा मृत्यू तर काही गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. या संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांना कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाला सलाम. भारतीय जवानांएवढे निस्वार्थी आणि धाडसी कोणीच नाही. त्यांच्या कुटुंबीयाच्या दुःखात सहभागी आहोत, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीन ट्विट केलं.  रोहित शर्मानं ट्विट केलं की,''आपले रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या खऱ्या नायकांना सलाम.''   

टॅग्स :भारतीय जवानरोहित शर्माविराट कोहलीयुवराज सिंग