Join us

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं दिले पुढच्या वर्षी निवृत्तीचे संकेत, पण CSK फ्रँचायझी सांगतेय वेगळंच

मागच्या वर्षी हाच संघ स्पर्धेतून सर्वातआधी बाद झाला होता. पण, यावेळी चेन्नईनं मोठी भरारी घेतली. आता त्यांचे लक्ष्य जेतेपदावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 15:28 IST

Open in App

चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) आयपीएल २०२१च्या प्ले ऑफमध्ये स्थान पटकावण्याचा पहिला मान पटकावला. ४० वर्षीय महेंद्रसिंग धोनीचे ( MS Dhoni) हे CSKसोबत आयपीएलमधील अखेरचे वर्ष असल्याची जोरदार चर्चा आहे आणि त्यामुळे कॅप्टन कूलला जेतेपदाची भेट देण्यास सर्वच सज्ज आहेत. पण, धोनीनं याबाबत मंगळवारी त्याची भूमिका स्पष्ट केली आणि चेन्नईत CSKच्या फॅन्ससमोर अखेरचा सामना खेळायला आवडेल, असे विधान करून पुढील पर्वातही खेळणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे २०२१ नव्हे तर २०२२ची आयपीएल ही धोनीची अखेरची स्पर्धा असेल, असा तर्क लावला जात आहे. पण, याबाबत CSK फ्रँचायझीचं काही वेगळंच म्हणणं आहे. 

धोनीला या पर्वात १३ सामन्यांत ८४ धावाच करता आल्या आहेत. त्यानं ११ झेल घेतले आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एकूण २१७ सामन्यांत ४७१६ धावा केल्या आहेत. त्यानं १२४ झेल व ३९ स्टम्पिंग केले आहेत.

इंडिया सिमेंटच्या ७५व्या वर्षानिमित्तानं धोनीनं त्याच्या चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. त्यात त्यानं निरोपाचा सामना चेन्नईत CSKच्या फॅन्ससमोर खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानं अप्रत्यक्षपणे पुढील आयपीएलमध्येही खेळणार असल्याचे संकेत दिले. तो म्हणाला, CSKसोबतचा निरोपाचा सामना तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार आहे, आशा करतो की आम्ही चेन्नईत खेळू आणि सर्व फॅन्ससमोर मला निरोपाचा सामना खेळता येईल.''

इंडिया सिमेंट्स या CSKचे मालकी हक्क असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यानं Cricbuzz ला सांगितले की, ''आयपीएल २०२२साठी आम्ही महेंद्रसिंग धोनीला रिटेन ( संघात कायम ठेवणार) करणार आहोत. तो पुढील वर्षीच नाही, तर कदाचीत पुढील काही वर्ष आमच्यासोबत राहील. अजून काही ठरलेले नाही. चेन्नईत फॅन्सना निरोपाचा सामना पाहायला मिळेल, असे विधान त्यानं केलं. याचा अर्थ असा नाही की तो पुढील वर्षीच निवृत्ती घेईल.''

   

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स
Open in App