भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश मिळवला आहे आणि १० ऑक्टोबरला इंग्लंडचा त्यांना सामना करावा लागणार आहे. विराट कोहलीचा ( Virat Kohli) फॉर्म हा भारतीय संघासाठी सर्वात मोठा प्लस पॉईंट ठरला आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत विराटने सर्वाधिक २४६ धावा केल्या आहेत. याच कामगिरीमुळे त्याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही नावावर करताना माहेला जयवर्धनेला मागे टाकले. आता उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी आयसीसीने ( ICC) विराटचा गौरव केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या IMP लढतीत भारत Playing XI मध्ये दोन बदल करणार; राहुल द्रविडचे संकेत
ऑक्टोबर महिन्याचा ICC Men's Player of the Monthचा पुरस्कार विराटला मिळाला आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रझा व दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर हेही या शर्यतीत होते, परंतु विराटने बाजी मारली. ३३ वर्षीय विराटने पाकिस्तानविरुद्ध केलेली नाबाद ८२ धावांची अविस्मरणीय खेळी त्याला हा पुरस्कार मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली. १६० धावांचा पाठलाग करताना भारताचे ४ फलंदाज ३१ धावांत माघारी परतले होते, परंतु विराटने पाचव्या विकेटसाठी हार्दिक पांड्यासह ११३ धावा जोडल्या. त्याने ५३ चेंडूंत नाबाद ८२ धावा करताना भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
''आयसीसीने हा पुरस्कार दिला हा मी माझा सन्मान मानतो. जगभरातील चाहत्यांनी मला मतदान केले आणि पॅनलच्या सदस्यांचेही आभार मानतो. हा पुरस्कार मी नामांकन मिळालेल्या अन्य सदस्यांना व माझ्या सहकाऱ्यांना ( खेळाडू, सपोर्ट स्टाफ) यांना समर्पित करतो,''असे विराट म्हणाला. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही २८ चेंडूंत नाबाद ४९ धावा केल्या आणि नेदरलँड्सविरुद्ध ४४ चेंडूंत ६२ धावा केल्या.
हा पुरस्कार जिंकणारे भारतीय
रिषभ पंत
आर अश्विन
भुवनेश्वर कुमार
श्रेयस अय्यर
विराट कोहली
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"