Join us  

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळांतील भांडण आता आयसीसी सोडवणार

बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी आयसीसीने तीन सदस्यांची समिती बनवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 11:16 PM

Open in App
ठळक मुद्देजोपर्यंत आम्हाला केंद्र सरकार परवानगी देत नाही, तोपर्यंत आम्ही दोन्ही देशांत मालिका खेळू शकत नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पण त्यानंतर बीसीसीआयकडून नुकसान भरपाईची मागणी पीसीबीने केली होती.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) यांच्यातील भांडण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोडवायचे ठरवले आहे. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी आयसीसीने तीन सदस्यांची समिती बनवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची उत्सुकता क्रीडा जगताला असते. हे दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकले जातात. पण या दोन्ही देशांमध्ये मालिका मात्र खेळवल्या गेलेल्या नाहीत. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यामध्ये द्विदेशीय सामन्यांसाठी करार केला होता. पण दोन्ही देशांतील परिस्थिती पाहता बीसीसीआयने आतापर्यंत द्विदेशीय सामने खेळायला परवानगी दिलेली नाही. जोपर्यंत आम्हाला केंद्र सरकार परवानगी देत नाही, तोपर्यंत आम्ही दोन्ही देशांत मालिका खेळू शकत नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पण त्यानंतर बीसीसीआयकडून नुकसान भरपाईची मागणी पीसीबीने केली होती. पीसीबीने याप्रकरणी आयसीसीकडे बीसीसीआयची तक्रारही केली होती. त्यामुळे आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आयसीसीने पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :बीसीसीआयआयसीसीक्रिकेट