Join us  

Deepak Chahar wedding date : तारीख ठरली!, भारतीय गोलंदाज दीपक चहर लवकरच अडकणार जयासोबत लग्नबंधनात!

भारताचा व चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याने मोठ्या रोमँटिक अंदाजात मागील आयपीएल स्पर्धेत गर्लफ्रेंड जया भारद्वाजला ( Jaya Bharadwaj) प्रपोज केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 4:55 PM

Open in App

भारताचा व चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याने मोठ्या रोमँटिक अंदाजात मागील आयपीएल स्पर्धेत गर्लफ्रेंड जया भारद्वाजला ( Jaya Bharadwaj) प्रपोज केले होते. दीपक व जया हे अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते आणि आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जूनला या दोघांचे लग्न होणार आहे आणि त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जया ही दिल्लीची राहणारी आहे आणि एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करते. 

आयपीएल २०२१च्या प्ले ऑफ लढतीत दीपक जयाला प्रपोज करणारा होता, असे त्याचे वडील लोकेंद्र सिंग चहर यांनी सांगितले. पण, महेंद्रसिंग धोनीने त्याला अखेरच्या साखळी सामन्यात प्रपोज कर असा सल्ला दिला. त्यामुळे पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीनंतर दीपकने स्टँड्समध्ये जाऊन जयाला प्रपोज केले.  चेन्नई सुपर किंग्सनेआयपीएल २०२२साठीदीपक चहरला १४ कोटींत पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले. CSK च्या यशात दीपकने महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे फ्रँचायझीने त्याच्यासाठी एवढी रक्कम मोजली. पण, दीपकला दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताच आले नाही. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत  पुनर्वसनासाठी गेला. तो पुढील दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.  त्यामुळे दीपक ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधून कमबॅक करण्याची अपेक्षा आहे. त्याने भारताकडून २० ट्वेंटी-२० व ७ वन डे सामन्यांत अनुक्रमे २६ व १० विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने ६३ सामन्यांत  ५९ विकेट्स टीपल्या आहेत.  

टॅग्स :दीपक चहरचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२२
Open in App