Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताने सामन्याबरोबर मालिकाही जिंकली, वेस्ट इंडिवर सहज विजय

या सामन्यासह भारताने एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने खिशात टाकली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 21:38 IST

Open in App

कटक : विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या धडाकेबाज खेळींसह भारताने तिसऱ्या सामन्याबरोबर एकदिवसीय मालिकाही खिशात टाकली. वेस्ट इंडिजने भारतापुढे विजयासाठी ३१६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा सहजपणे पाठलाग भारताच्या संघाने चार विकेट्स राखून सामना जिंकला आणि  मालिकेवर झेंडा फडकवला. या सामन्यासह भारताने एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने खिशात टाकली. 

वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला भक्कम शतकी सलामी मिळाली. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी १२२ धावांची सलामी देत संघाच्या विजयाचा पाया रचला. या भक्कम पायावर कोहलीने कळस चढवला. रोहितने यावेळी आठ चौकार आणि एका षटकारासह ६३ धावांची खेळी साकारली. राहुलने आठ चौकार आणि एका षटकारासह ७७ धावा केल्या. विराटने यावेळी १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८९ धावांची खेळी केली.

रोहित आणि राहुल यांना शतक झळकावण्यात अपयश आले. पण हे दोघे बाद झाल्यावर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना आपली छाप पाडता आली नाही, या गोष्टीला अपवाद फक्त कोहलीचा. पण रिषभ पंत, श्रेयस अय्यर, केदार जाधव हे मोठी खेळी साकारण्यात आणि कोहलीला साथ देण्यात अपयशी ठरले. त्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजाने कोहलीबरोबर अर्धशतकी भागीदारी रचली आणि संघाला विजय मिळवण्याता मोलाचा वाटा उचलला.

 तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारतापुढे ३१६ धावांचे आव्हान ठेवले. निकोलस पुरन आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड यांच्या दमदार खेळींच्या जोरावर संघाला ही आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पुरनने या सामन्यात ६४ चेंडूंत ८९ धावांची खेळी साकारली, यामध्ये १० चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांनी पहिली सहा षटके टाकली. त्यानंतर सातव्या षटकात सैनीला पहिले षटक टाकण्याची संधी देण्यात आली. सैनीने या सामन्यात भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजाना बाद केले.

वेस्ट इंडिजकडून एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. वेस्ट इंडिजच्या पहिल्या चार फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. पण या चौघांना अर्धशतक मात्र झळकावता आले नाही. 

रोहित शर्माने टाकले विराट कोहलीला पिछाडीवर; केला हा पराक्रमभारताचा सलामीवीर रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह रोहितने भारताचा कर्णधार विराट कोहलीला पिछाडीवर टाकल्याचे पाहायला मिळाले आहे.

रोहितने तिसऱ्या सामन्यात आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६३ धावांची दमदार खेळी साकारली. ही खेळी साकरताना रोहितने कोहलीला पिछाडीवर सोडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर रोहितने २२ वर्षांपूर्वीचा एक विक्रमही यावेळी मोडीत काढला आहे.

रोहितने यंदाच्या वर्षात १४९० धावा केल्या आहेत.  कोहलीने एका वर्षात सर्वाधिक धावा २०१७ साली केल्या होत्या. कोहलीने २०१७ साली १४६० धावा केल्या होत्या. रोहितने त्याच्यापेक्षा एका वर्षात ३० धावा जास्त करत कोहलीला पिछाडीवर टाकले आहे.

रोहित शर्माने मोडला २२ वर्षांपूर्वीचा विक्रम, पाहा केला कोणता पराक्रमभारताचा सलामीवीर आणि उप कर्णधार रोहित शर्माने २२ वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. हा विक्रम मोडीत काढताना रोहितने भल्या भल्या फलंदाजांना मागे सारले आहे.

रोहितने या एका वर्षात २५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या २५ सामन्यांमध्ये रोहितने २४०० धावांचा पल्ला पार केला आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा माजी धडाकेबाद सलामीवीर सनथ जयसूर्याच्या नावावर होता. जयसूर्याने एका वर्षात सलामीवीर म्हणून २३८७ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीतने तब्बल २२ वर्षांनी मोडीत काढला आहे.

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्मालोकेश राहुलभारत विरुद्ध वेस्ट इंडिज