Smriti Mandhana Smashed Century : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलचं तिकीट पक्के करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात वनडे क्वीन स्मृती मानधना हिच्या भात्यातून कडक आणि विक्रमी शतकी खेळी पाहायला मिळाली. याआधीच्या दोन्ही सामन्यात स्मृती मानधनाने मोठी खेळी केली. पण शतकी डाव साधण्यात ती अपयशी ठरली. न्यूझीलंड विरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीत स्मृतीनं ८८ चेंडूत अखेर शतकी डाव साधला. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय बॅटरच्या बॅटमधून आलेले हे पहिले शतक ठरले. एवढेच नाही तर या शतकी खेळीसह स्मृतीनं खास विक्रमालाही गवसणी घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महिला वनडेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या बॅटरच्या यादीत दुसऱ्या स्थानी घेतली झेप
स्मृती मानधनाचे वनडेतील हे १४ वे तर वर्ल्ड कप स्पर्धेतील हे तिसरे शतक ठरले. या खेळीसह न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला (१३ शतके) मागे टाकत स्मृती मानधना महिला वनडेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या बॅटरच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. आता फक्त ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग तिच्या पुढे आहे. तिने १०३ वनडेतील १०२ डावात १५ शतके झळकावली आहेत. तिला मागे टाकण्यासाठी स्मृती मानधनाला आणखी दोन शतकांची आवश्यकता आहे.
बारावीच्या परीक्षेत ९२.५ टक्के गुण; बास्केटबॉलमध्ये गोल्ड! अंपायरची लेक कशी झाली टीम इंडियाची ओपनर?
उत्तुंग फटकेबाजीसह सेट केला सर्वाधिक सिक्सर मारण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड
स्मृती मंधानानं हिने आपल्या शतकी खेळीत ४ उत्तुंग षटकार मारले. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात दोन षटकार मारताच तिने मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. २०२५ मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या स्मृतीनं या वर्षात ३१ षटकार मारले आहेत. एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आता तिच्या नावे झाला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल ली हिनं २०१७ मध्ये एका वर्षात २८ षटकारा मारले होते. हा विक्रम मोडीत काढत स्मृतीनं नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे.