कोण आहे Brian Bennett? झिम्बाब्वेच्या पठ्ठ्यानं 'विराट' कामगिरीसह मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड

कोण आहे ब्रायन बेनेट? कशी राहिलीये त्याची आंतरारष्ट्रीय टी-२० तील कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:00 IST2026-02-27T14:59:00+5:302026-02-27T15:00:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs ZIM Who Is Brian Bennett Zimbabwe Star Broke Virat Kohli Record In T20 World Cup 2026 | कोण आहे Brian Bennett? झिम्बाब्वेच्या पठ्ठ्यानं 'विराट' कामगिरीसह मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड

कोण आहे Brian Bennett? झिम्बाब्वेच्या पठ्ठ्यानं 'विराट' कामगिरीसह मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ (ICC Men's T20 World Cup 2026) स्पर्धेतील सुपर-८ फेरीतील भारताविरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीत झिम्बाब्वेला पराभवाचा सामना कराव लागला. यासह  झिम्बाब्वेचा स्पर्धेतील खेळही खल्लास झाला. पण या सामन्यात झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेट (Brian Bennett) याने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवत टीम इंडियातील गोलंदाजांचे खांदे पाडले. २२ वर्षी बेनेटला दमदार खेळीनंतर झिम्बाब्वेचा विराट कोहली असा टॅग लागला आहे. एवढेच नाही तर टीम इंडियाविरुद्ध नाबाद ९७ धावांच्या खेळीत त्याने किंग कोहलीचा खास विक्रमही मोडला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

इथं जाणून घेऊयात कोण आहे  ब्रायन बेनेट? त्यानं विराटचा कोणता विक्रम मोडला? यासह त्याच्या खास कामगिरीवर एक नजर  आहे  वर्षांच्या बेनेटने आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याच्या खेळाकडे पाहता अनेक जण त्याला झिम्बाब्वेचा ‘Virat Kohli’ असे संबोधू लागले आहेत. विशेष म्हणजे या वर्ल्ड कपमध्ये त्याने 5 सामने खेळले असून तो फक्त एकदाच बाद झाला आहे.

टीम इंडियानं धावांसह केली 'या' विक्रमांची 'बरसात'; T20 World Cup स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं

भारताविरुद्ध शतक हुकलं

सुपर-८ फेरीतील भारताविरुद्धच्या सामन्यात ब्रायन बेनेट याने ५९ चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी ८ चौकार आणि ६ षटकारांनी बहरलेली होती. अवघ्या ३ धावांनी त्याचे शतक हुकले. या खेळीसह तो यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. आतापर्यंतच्या पाच डावात तो फक्त वेस्ट इंडिज विरुद्धच्या  सामन्यातच आउट झाल्याचे पाहायला मिळाले.  

कोण आहे ब्रायन बेनेट? कशी राहिलीये त्याची आंतरारष्ट्रीय टी-२० तील कामगिरी

ब्रायन बेनेट हा झिम्बाब्वेच्या संघातील उजव्या हाताचा सलामीचा बॅटर आहे. वेळप्रसंघी तो ऑफस्पिन गोलंदाजीही करू शकतो. २०२३ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली . आतापर्यंतच्या टी-२० कारकिर्दीत त्याने ६२ सामन्यातील ५९ डावात १९३१ धावा केल्या आहेत. तो अल्पवाधीत खास छाप सोडणाऱ्या क्रिकेटपैकी एक आहे. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ब्रायन बेनेट याने ५ डावांत २७७ धावा केल्या आहेत. साखळी फेरीत  श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघांविरुद्धही तो नाबाद राहिला. भारताविरुद्धच्या सामन्यातही तो शेवटपर्यंत टिकून राहिला. 

विराट कोहलीचा विक्रम मोडला

ब्रायन बेनेट याने यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धत कामगिरीतील सातत्य राखत विराट कोहलीचा खास विक्रम मोडीत काढला आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या एका हंगामात २०० पेक्षा अधिक धावा करताना सर्वोच्च सरासरीच्या बाबतीत त्याने किंग कोहलीला मागे टाकले आहे. कोहलीने २०१६ च्या हंगामात १३६.५० ; २०१४ च्या हंगामात १०६.३३ आणि २०२२ च्या  हंगामात ९८.६६ च्या सरासरीने २०० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.  यंदाच्या हंगामात ब्रायन बेनेट याने २७७ च्या स्ट्राइक रेटनं २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

Web Title : ब्रायन बेनेट: जिम्बाब्वे के उभरते सितारे ने तोड़ा विराट कोहली का रिकॉर्ड

Web Summary : जिम्बाब्वे के सलामी बल्लेबाज ब्रायन बेनेट ने टी20 विश्व कप में शानदार प्रदर्शन किया, जिसकी तुलना विराट कोहली से की जा रही है। भारत के खिलाफ नाबाद 97 रन बनाकर उन्होंने 200 से अधिक रन के साथ टी20 विश्व कप सीजन में सबसे अधिक औसत का कोहली का रिकॉर्ड तोड़ा।

Web Title : Brian Bennett: Zimbabwe's rising star breaks Virat Kohli's record.

Web Summary : Brian Bennett, Zimbabwe's opener, impressed in the T20 World Cup, earning comparisons to Virat Kohli. His unbeaten 97 against India broke Kohli's record for highest average in a T20 World Cup season with over 200 runs, showcasing his talent and consistency.