Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs ZIM : अभिषेक शर्माचा संघर्ष संपला! झिम्बाब्वेविरुद्ध साजरे केलं वर्ल्ड कपमधील पहिले अर्धशतक

सलग तीन सामन्यात पदरी पडला भोपळा, पाचव्या सामन्यात साधला अर्धशतकी डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 20:09 IST

Open in App

IND vs ZIM Abhishek Sharma Record His First Fifty Of ICC T20 World Cup : टी-२० वर्ल्ड कप २०२५  स्पर्धेतील बॅक टू बॅक फ्लॉप शोनंतर अखेर झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माची बॅट तळपली. सेमीफायनलच्या शर्यतीतील टीम इंडियासाठी आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लढतीत अभिषेक शर्मानं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक झळकावले.  टी-२० कारकिर्दीतील  ९ व्या अर्धशतकासाठी अभिषेकनं २६ चेंडूचा सामना केला. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा खेळणारा अभिषेक शर्मा सुरुवातीच्या टप्प्यात धावांसाठी चांगलाच संघर्ष करताना दिसला.  अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. सुपर ८ फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने १२ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५ धावा केल्या. पण चांगली सुरुवात मिळाल्यावर तो फसला. पण आता मोक्याच्या क्षणी तो फॉर्ममध्ये परतला आहे. 

WI vs SA : जेसन होल्डर-रोमारियो शेफर्डचा धडाकेबाज शो! जोडीनं 'या' विश्वविक्रमाला घातली गवसणी

 अभिषेक शर्मा हा पहिल्या चेंडूपासून आक्रमक अंदाजात खेळताना दिसते. पण फॉर्म परत मिळवण्यासाठी त्याने संयमी खेळी करत डाव बहण्याला पसंती दिली. अर्धशतकानंतर तो गियर बदलून आपल्या जुन्या तोरा दाखवून देईल, अशी अपेक्षा होती. पण  टिनोटेंडा मापोसाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो फसला. ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकाच्या खेळीला ५५ धावांवर ब्रेक लागला. सिकंदर रझाने त्याचा झेल टिपला.

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek Sharma scores first World Cup fifty against Zimbabwe after struggle.

Web Summary : Abhishek Sharma's bat shined against Zimbabwe, scoring his first T20 World Cup fifty after previous failures. He scored 55 runs in 30 balls, including 3 fours and 4 sixes, before being caught out.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत-झिम्बाब्वेअभिषेक शर्मा