Join us

IND Vs WIN One Day : युजवेंद्र चहलच्या 'त्या' फोटोवर चाहत्यांना आठवले 'टॉम अॅण्ड जेरी'!

IND Vs WIN One Day : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना बुधवारी विशाखापट्टणम् येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ विजाकमध्ये दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 09:24 IST

Open in App

विशाखापट्टणम् : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना बुधवारी विशाखापट्टणम् येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ विजाकमध्ये दाखल झाला आहे. गुवाहाटी वन डेत दणदणीत विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या वन डेत फिरकीपटू युजवेंद्र चहलने तीन विकेट घेतल्या होत्या. याच चहलने विजाकसाठीच्या प्रवासाचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि चाहत्यांकडून तो ट्रोल झाला. अनेकांनी तर त्या फोटोवर उंदीर आणि मांजर, अशी कमेंटही केली.

पहिल्याच सामन्यात भारताने 8 विकेट राखून विजय मिळवला. त्यानंतर विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रवाना झाला. या दरम्यान चहलने सलामीवीर शिखर धवन याच्या सोबतचा फोटो पोस्ट केला. त्यावर त्याने शेर आणि बब्बर शेरचा एकत्र प्रवास, अशी कॅप्शन दिली, त्याच्या या कॅप्शनवर चाहत्यांनी खिल्ली उडवली.   पहिल्या वन डेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची उत्तम कामगिरी केली. कायरेन पॉवेल ( 51) आणि शिमरोन हेटमेयर ( 106) यांच्या फटकेबाजीने विंडीजला 322 धावांचा पल्ला गाठून दिला. भारताने हे लक्ष्य 42.1 षटकांत सहज पार केले. रोहित शर्माने नाबाद 152 धावा चोपल्या, तर विराट कोहलीने 140 धावांची खेळी केली. 

टॅग्स :युजवेंद्र चहलभारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवन