Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND Vs WIN 2nd One Day : विराट कोहली ठरला दहा हजारी मनसबदार

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 16:12 IST

Open in App
ठळक मुद्दे विराटने दहा हजार धावांचा टप्पा 205 डावांमध्ये ओलांडला आहे.

विशाखापट्टणम : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज दहा हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. विराटने दहा हजार धावांचा टप्पा 205 डावांमध्ये ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला आहे.

या सामन्यात सर्वांचे लक्ष लागले आहे ते कर्णधार विराट कोहलीच्या या विक्रमाकडे. विराटने 204 डावांमध्ये 9919 धावा केल्या होत्या आणि त्याला 10000 धावा करण्यासाठी 81 धावांची गरज होती.

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग यांनी अनुक्रमे 259, 263 आणि 266 डावांमध्ये हा पल्ला गाठला आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज