Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND Vs WIN 1st One Day : कोहलीच्या 'विराट' खेळीला तोड नाही, केला आणखी एक पराक्रम

IND Vs WIN 1st One Day : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा आपल्या फटकेबाजीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 19:01 IST

Open in App

गुवाहाटी : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा आपल्या फटकेबाजीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. आशिया चषक स्पर्धेतील विश्रांतीनंतर वन डे संघात पुनरागमन करणाऱ्या विराटने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने फटकेबाजी करताना वन डे क्रिकेटमधील 49 वे अर्धशतक पूर्ण केले. 

विराटने 37 चेंडूंत 10 चौकार लगावताना वैयक्तिक पन्नास धावांचा पल्ला पार केला. या कामगिरीसह त्याने 2018 वर्षात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून 2000 धावा करण्याचा विक्रमही केला. यंदाच्या वर्षात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. विराटने सलग दुसऱ्या वर्षी हा पराक्रम केला आहे. त्याने गतवर्षी 2818 धावा केल्या होत्या.  2018 साली वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट चौथ्या स्थानावर आहे. त्याने 10 सामन्यांत 813* धावा केल्या आहेत. या क्रमवारीत इंग्लंडचा जॉनी बेअरस्टोव 22 सामन्यांत 1025 धावांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ इंग्लंडचेच जो रूट ( 904) आणि जेसन रॉय ( 845) यांचा क्रमांक येतो. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयभारत विरुद्ध वेस्ट इंडिज