गुवाहाटी : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यातून रिषभ पंत वन डे संघात पदार्पण करणार आहे, तर वेस्ट इंडिजकडून ओशाने थॉमस आणि चंद्रपॉल हेमराज यांचे पदार्पण होणार आहे.
विंडीजविरुद्ध भारत मायदेशात 50 वन डे सामने खेळला आहे. त्यात भारताने 24, तर विंडीजने 26 सामने जिंकले आहेत. परंतु, मागील 25 वर्षांत भारताने सर्वाधिक 22 विजय मिळवले आहेत.
भारताने घरच्या मैदानावर खेळताना मागिल 11 वन डे मालिकेत 10 वेळा विजय मिळवला आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ( 2-3) पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे वेस्ट इंडिजला मागील 11 वन डे मालिकांमध्ये विजय मिळवता आलेला नाही.