Join us

IND VS WI: शतक झळकावल्यावर झाली कुणाची आठवण... सांगतोय दस्तुरखुद्द पृथ्वी शॉ

शतक झळकावल्यावर पृथ्वीला पहिली आठवण कुणाची आली, हे तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 17:59 IST

Open in App
ठळक मुद्देसामना संपल्यावर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी पृथ्वीची मुलाखत घेतली.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावत पृथ्वी शॉ याने साऱ्यांची मने जिंकली. शतक पूर्ण केल्यावर त्याने मैदानात एकच जल्लोष केला. संघ सहकाऱ्यांनीही यावेळी टाळ्यांच्या गजरात पृथ्वीला शाबासकी दिली. पण शतक झळकावल्यावर पृथ्वीला पहिली आठवण कुणाची आली, हे तुम्हाला माहिती आहे का...

थ्वीने १९ चौकारांच्या जोरावर १३४ धावांची दिमाखदार खेळी साकारली. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी २०६ धावांची भक्कम भागीदारी रचली. पृथ्वी १ जानेवारी २०१७ साली पहिला रणजी सामना खेळला. हा सामना तामिळनाडूविरुद्ध होता. या सामन्याच्या दुसऱ्या डावात पृथ्वीने १२० धावांची खेळी साकारल्यामुळे मुंबईला विजय मिळवता आला होता. पृथ्वीचा हा पहिला रणजी सामना राजकोटच्याच मैदानात झाला होता. त्यामुळे पृथ्वी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत असला तरी त्याचे या मैदानातील हे दुसरे शतक ठरले आहे.

सामना संपल्यावर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी पृथ्वीची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये पृथ्वी म्हणाला की, " हा माझ्यासाठी फक्त एक सामना होता. पुढच्यावेळीही माझा हाच विचार असेल. सामना सुरु होण्यापूर्वी मी निराश होतो. पण जसजसा मी खेळत गेलो तसतसा माझा आत्मविश्वास वाढत गेला. मी शतक झळकावले तेव्हा पहिल्यांदा मला माझ्या बाबांची आठवण आली."

टॅग्स :पृथ्वी शॉभारत विरुद्ध वेस्ट इंडिज