Join us  

IND VS WI : विराट कोहलीने माजी कर्णधार गांगुली व धोनी यांना मागे टाकले

IND VS WI: भारताने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा डाव 181 धावांत गुंडाळला आणि पाहुण्यांना फॉलोऑन दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 12:45 PM

Open in App

राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा डाव 181 धावांत गुंडाळला आणि पाहुण्यांना फॉलोऑन दिला. भारताने पहिला डाव 9 बाद 649 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला पहिल्या डावात जेमतेम 181 धावा करता आल्या. रोस्टन चेस ( 53) आणि मिमो पॉल ( 47) वगळता विंडीजच्या एकाही फलंदाजाला भारताच्या गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 468 धावांची आघाडी घेतली. 

भारताने विंडीजला फॉलोऑन दिला. याचबरोबर कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावावर एक आणखी विक्रम नोंदवला. त्याने पाचव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन देत माजी कर्णधार सौरव गांगुली आणि महेंद्रिसिंग धोनी यांना पिछाडीवर टाकले. 

गांगुली आणि धोनी यांनी आपल्या कर्णधारपदाच्या काळात प्रत्येकी 4-4 वेळा प्रतिस्पर्धी संघांना फॉलोऑन दिला होता. विराटने आज त्यांना मागे टाकले. सुनील गावस्कर व राहुल द्रविड यांनीही प्रत्येकी 3-3 वेळा प्रतिस्पर्धी संघांना फॉलोऑन दिला आहे. या विक्रमात माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ( 7 फॉलोऑन) आघाडीवर आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीसौरभ गांगुलीमहेंद्रसिंह धोनी