Join us  

Ind vs WI :  टीम इंडियाचा पहिला डाव गुंडाळला, हनमाच्या शतकामुळे भारताच्या 416 धावा

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतची विकेट गेली आणि भारताला धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 1:41 AM

Open in App

किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 416 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार झालेल्या भारताच्या अष्टपैलू हनुमा विहारीने पहिल्या डावात शतकी कामगिरी केली. सबीना पार्कच्या मैदानात त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक साजरे केलं. त्यासाठी त्याने २०० चेंडूचा सामना करत 16 चौकार ठोकले. विशेष म्हणजे टीम इंडियाचा फलंदाज ईशांत शर्मानेही चौकाराच्या मदतीने कसोटी कारकिर्दीतील आपले पहिलं अर्धशतक झळकावले. या दोघांनी मिळून १०० धावांची भागीदारी देखील पूर्ण केली. 

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतची विकेट गेली आणि भारताला धक्का बसला. भारताला पंतकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण पंतला आजच्या दिवशी फक्त एकच चेंडू खेळता आला. पंत आणि हनुमा विहारी हे आजच्या दिवसाची कशी सुरुवात करतात, हे पाहणे उत्सुकतेचे होते. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारून देइल, अशी चाहत्यांना आशा होती. पण पंतने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट बहाल करत चाहत्यांना नाराज केले. त्यानंतर, हनुमाने उत्कृष्ट खेळ करत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची कामगिरी बजावली. 

जे गेल्या ५० वर्षांत गोलंदाजांना जमले नाही ते आज घडले...आतापर्यंत क्रिकेट विश्वात जे एकाही गोलंदाजाला घडले नाही ते आज घडल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत क्रिकेट जगताने बरेच महान गोलंदाज पाहिले. पण जे या महान गोलंदाजांना आतापर्यंत जमले नाही ते आज घडल्याचे पाहायला मिळाले.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध वेस्ट इंडिजइशांत शर्मा