Join us

IND vs WI T20: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल; तीन प्रमुख खेळाडूंना विश्रांती

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेत यजमानांनी २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 10:50 IST

Open in App

चेन्नई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेत यजमानांनी २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील अखेरचा सामना रविवारी चेन्नईत होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. 

लखनौ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने वादळी खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे औपचारिक म्हणून राहिलेल्या तिसऱ्या सामन्यात संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेता संघाने विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी जस्प्रीत बुमरा, उमेश यादव आणि कुलदीप यादव या प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या सामन्यासाठी बीसीसीआयने संघात सिध्दार्थ कौलचा समावेश केला आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजजसप्रित बुमराहकुलदीप यादव