Join us

IND vs WI T20I Schedule : रोहित शर्मा, रिषभ पंतसह 7 खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये दाखल, जाणून घ्या T20I Series चे संपूर्ण वेळापत्रक

India vs West Indies T20I Series : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वन डे मालिका जिंकली आहे आणि तिसरा वन डे सामना बुधवारी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 15:09 IST

Open in App

India vs West Indies T20I Series : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वन डे मालिका जिंकली आहे आणि तिसरा वन डे सामना बुधवारी होणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर विश्रांतीवर गेलेला रोहित शर्मा ( Rohit Sharma), रिषभ पंत, दिनेश कार्तिक हे पुन्हा मैदानावर दिसणार आहेत. रोहित, रिषभसह ट्वेंटी-20 संघातील 7 खेळाडू मंगळवारी दाखल झाले. विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांना या ट्वेंटी-20 मालिकेसाठी विश्रांती दिली गेली आहे.  

रोहित व रिषभ यांनी कॅरेबियन बेटावर पोहोचल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. "Hello Trinidad" असे रोहितने त्याच्या इंस्टापोस्टवर लिहिले आहे. भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हर्षल पटेल, आर अश्विन व हार्दिक पांड्या हेही या ट्वेंटी-20 मालिकेसाठीच्या संघाचे सदस्य आहेत. लोकेश राहुलच्या सहभागावर अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यातून सावरण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे. कुलदीप यादवने फिटनेस टेस्ट पास केली आहे.  

भारताचा टी२० संघ- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. 

ट्वेंटी-२० मालिका- 

  • २९ जुलै - पहिला ट्वेंटी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन
  • १ ऑगस्ट - दुसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
  • २ ऑगस्ट - तिसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
  • ६ ऑगस्ट - चौथा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा
  • ७ ऑगस्ट - पाचवा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा

(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मारिषभ पंतदिनेश कार्तिक
Open in App