IND vs WI T20: पोलार्डचा रडीचा डाव, जस्प्रीत बुमरा नाराज

IND vs WI T20:भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेत यजमानांनी 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 14:37 IST2018-11-07T14:29:36+5:302018-11-07T14:37:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs WI T20: Jasprit Bumrah disappointed with pollard | IND vs WI T20: पोलार्डचा रडीचा डाव, जस्प्रीत बुमरा नाराज

IND vs WI T20: पोलार्डचा रडीचा डाव, जस्प्रीत बुमरा नाराज

लखनौ : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेत यजमानांनी 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मंगळवारी दुसऱ्या सामन्यात 71 धावांनी विजय मिळवला. पण, या सामन्यात विंडीजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने रडीचा डाव खेळला. त्यामुळे भारताचा गोलंदाज जस्प्रीत बुमराने नाराजी व्यक्त केली. 

बुमराच्या बाऊंसरवर पोलार्डने टोलावलेला चेंडू जागच्याजागी हवेत उडाला. त्यावर बुमरा झेल टिपण्यासाठी पुढे आला, परंतु त्याचवेळी पोलार्ड त्याच्या शेजारी आला. बुमराच्या हातात चेंडू विसावणार त्याचवेळी पोलार्डने मुद्दाम हात वर केला. बुमराला झेल टिपण्यात यश मिळाले, परंतु पोलार्डच्या या कृत्यावर त्याने नाराजी प्रकट केली. रोहितच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 195 धावांचा डोंगर उभा केला. त्या उत्तरात वेस्ट इंडिजला 124 धावा करता आल्या. 


Web Title: IND vs WI T20: Jasprit Bumrah disappointed with pollard