Join us

IND VS WI: मैदानात जडेजाने केली नौटंकी आणि कोहलीने हासडली शिवी

आपले पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या रवींद्र जडेजाने या सामन्यात एक नौटंकी केली आणि त्याच्या गोष्टी कर्णधार विराट कोहलीने शिवी हासडली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 17:38 IST

Open in App
ठळक मुद्देया सामन्यात एक अशी घटना घडली की ती पाहून सारेच हबकून गेले.

राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघामे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर वर्चस्व मिळवले आहे. या सामन्यात एक अशी घटना घडली की ती पाहून सारेच हबकून गेले. आपले पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या रवींद्र जडेजाने या सामन्यात एक नौटंकी केली आणि त्याच्या गोष्टी कर्णधार विराट कोहलीने शिवी हासडली.

जडेजाने शतक पूर्ण केल्यावर ६४९ धावांवर भारताने आपला पहिला डाव घोषित केला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला भारतीय गोलंदाज एकामागून एक धक्के देत होते. यावेळीच ही गोष्ट घडल्याचे समोर आले आहे.

जडेजाने यावेळी वेस्ट इंडिजचा फलंदाज हेटमायरला धावचीत केले. त्याला धावचीत करताना जडेजाने जे नाट्य केले ते पाहून कोहलीसह गोलंदाज आर. अश्विनही चांगलाच वैतागला होता.

हेटमायर हा अर्ध्या खेळपट्टीवर असताना जडेजाच्या हातात चेंडू विसावला होता. त्यावेळी जडेजाने चेंडू अश्विनकडे न फेकण्याचा निर्णय घेतला. जडेजा स्वत: चेंडू घेऊन यष्ट्यांच्या दिशेने गेला. त्यावेळी जडेजाला वाटले की आपण थोडी गंमत करून त्यामुळे त्याने चेंडू हातात ठेवून गल्लीतली नौटंकी करायला सुरुवात केली. त्यावेळी हेटमायर हा जवळपास क्रिझजवळ आला होता. ते पाहून जडेजा गांगरुन गेला. आपला हातातला चेंडू त्याने यष्ट्यांवर फेकला. जर जडेजाला काही सेकंद उशिर झाला असता किंवा चेंडू यष्ट्यांवर गेला नसता तर हेटमायर नाबाद राहिला असता.

हा जडेजाजा प्रताप पाहून कोहलीने पहिल्यांदा तर एक शिवी हासडली. तुला काय करायचे ते कळत नाही का, अशी कोहलीची देहबोली जडेजाला सांगत होती. त्याचबरोबर अश्विनही चांगलाच वैतागला होता. जडेजा नेमकं करतो तरी काय, हेच अश्विनला यावेळी म्हणायचे होते.

टॅग्स :रवींद्र जडेजाविराट कोहलीआर अश्विनभारत विरुद्ध वेस्ट इंडिज