राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : मुंबईकर पृथ्वी शॉ याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पणातच शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या खेळाची तुलना नेहमीच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्याशी केली गेली आहे. त्यात गुरूवाच्या त्याच्या खेळीने क्रिकेट वर्तुळात त्याच्याच नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्याने 154 चेंडूंत 134 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि त्यात खणखणीत 19 चौकार लगावले. या खेळीनंतर भारताला नवा सुपरस्टार मिळाला असल्याची चर्चा रंगत आहे. त्याचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND VS WI : पृथ्वी शॉ, भारताचा नवा 'Superstar'! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
IND VS WI : पृथ्वी शॉ, भारताचा नवा 'Superstar'! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
IND VS WI: मुंबईकर पृथ्वी शॉ याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पणातच शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 15:29 IST