Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND VS WI : कुलदीप यादवने गोलंदाजी सोडली, बनला कॉमेंटेटर

IND VS WI : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना आरामात खिशात घातला. या सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 10:34 IST

Open in App

राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना आरामात खिशात घातला. भारताने पहिल्या डावात उभ्या केलेल्या 649 डावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात त्याने संयमी सुरूवात केली, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 196 धावांवर माघारी परतला. भारताने एक डाव व 272 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने प्रथमच पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.

कुलदीपने विंडीजच्या पाच फलंदाजांना अवघ्या 57 धावांवर बाद केले. या कामिगिरीसह चालू वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाच बळी टिपण्याचा विक्रम नावावर केला. त्याने इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-20 आणि वन डे सामन्यात अनुक्रमे 5 बाद 24 आणि 6 बाद 25 अशी कामगिरी केली होती.  एका वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात पाच बळी टिपणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. विक्रमी कामगिरी केल्यानंतर मात्र कुलदीपने कॉमेंटेटर बनण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तो कसून सरावालाही लागला आहे. BCCI ने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये कुलदीपचा समालोचक बनण्याचा सराव दिसत आहे. एका लॅपटॉपवर त्याच्याच गोलंदाजीचे तो समालोचक करत आहे. टेंशन घेऊ नका... तो काही गोलंदाजी सोडत नाही. आपल्या गोलंदाजीत अधिक सुधारणा कशी करता येईल म्हणून तो व्हिडीओ पाहत आहे. गंमत म्हणून तो समालोचन करताना दिसत आहे. 

कुलदीपचा संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा...http://www.bcci.tv/videos/id/6610/meet-commentator-cool-deep-yadav

टॅग्स :कुलदीप यादवभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबीसीसीआय