हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भारताने एक डाव व 272 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फक्त शुक्रवारी अंतिम अकरा खेळाडूंमध्ये शार्दूल ठाकूरला संधी मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीला विश्रांती देऊन युवा खेळाडू मयांक अग्रवाल याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्याता अंतिम 12 मध्ये स्थान पटकावण्यात अपयश आले. मयांकने 2017-18 च्या हंगामात रणजी क्रिकेटमध्ये 13 सामन्यांत 1160 धावा केल्या आहेत.