Join us

IND VS WI : मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवणारा पृथ्वी तुम्ही पाहिलात का?

IND VS WI: मुंबईच्या मैदानावर धावांचा डोंगर उभा करणाऱ्या पृथ्वी शॉने अवघ्या चार वर्षांत भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 10:15 IST

Open in App

राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : मुंबईच्या मैदानावर धावांचा डोंगर उभा करणाऱ्या पृथ्वी शॉने अवघ्या चार वर्षांत भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने खोऱ्याने धावा करणाऱ्या पृथ्वीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले. दमदार ड्राईव्ह मारून त्याने आपले खाते उघडले. आज राष्ट्रीय संघाकडून पदार्पण करणारा हा पृथ्वी एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर सुसाट सायकल चालवायचा... त्याच्या कसोटी पदार्पणाच्या निमित्ताने सोशल मीडियावर त्याचा तो व्हिडीओ व्हायरल होत आहे. राजकोट येथे सुरू असलेल्या या सामन्यात मैदानावर उतरताच त्याने आणखी एक विक्रम नावावर केला. कसोटीत पदार्पण करणारा तो भारताचा दुसरा युवा सलामीवीर ठरला आहे. त्याने 18 वर्ष 329 दिवसांत कसोटीत पदार्पण केले. हा विक्रम विजय मेहरा यांच्या नावावर आहे. त्यांनी 17 वर्ष 265 दिवसांचे असताना पहिली कसोटी खेळली होती. 1955 मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध हा सामना खेळला होता. 

 

टॅग्स :पृथ्वी शॉभारत विरुद्ध वेस्ट इंडिज