Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs WI : हे तुम्हाला माहिती आहे का... पृथ्वी शॉने मागून घेतला विनिंग शॉट

मालिकेची विजयी सांगताही आपणच करावी, अशी इच्छा बाळगणे गैर नाही आणि हेच पृथ्वी शॉ याच्या बाबतीतही घडले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 17:33 IST

Open in App
ठळक मुद्देमोठा फटका मारण्याच्या तयारीत राहुल होता. पण त्याने तसे का केले नाही, हे तुम्हाला माहिती आहे का?

हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करावी, असे प्रत्येकाला वाटत असते. त्याचबरोबर मालिकेची विजयी सांगताही आपणच करावी, अशी इच्छा बाळगणे गैर नाही आणि हेच पृथ्वी शॉ याच्या बाबतीतही घडले. 

वेस्ट इंडिजवर विजय मिळवायला भारताला सोळाव्या षटकात फक्त एका धावेची गरज होती. सलामीवीर लोकेश राहुल आता मोठा फटका मारणार आणि संघाला विजय मिळवून देणार, असे वाटत होते. मोठा फटका मारण्याच्या तयारीत राहुल होता. पण त्याने तसे का केले नाही, हे तुम्हाला माहिती आहे का?

सोळाव्या षटकात विजयसाठी एक धाव हवी असताना पृथ्वी लोकेशजवळ आला आणि त्याने मला विनिंग शॉट मारायला दे, असे सांगितले. राहुलनेही या युवा फलंदाजाला निराश केले नाही. राहुलने सोळावे षटक खेळून काढले. त्यानंतर सतराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत पृथ्वीने विनिंग शॉट मारण्याची इच्छा पूर्ण केली.

टॅग्स :पृथ्वी शॉभारत विरुद्ध वेस्ट इंडिज