Join us

IND vs WI : दोन चेंडूंत दोन अर्धशतकांचा योगायोग, पाहा हा व्हिडीओ...

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हा योगायोग पाहता आला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 16:31 IST

Open in App
ठळक मुद्देदोन चेंडूमध्ये दोन अर्धशतके पाहण्याचा डबल धमाका भारतीय चाहत्यांच्या नशिबी आला.

हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : दोन चेंडूमध्ये दोन अर्धशतके पाहण्याचा डबल धमाका भारतीय चाहत्यांच्या नशिबी आला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हा योगायोग पाहता आला. 

भारताच्या डावाच्या ६४व्या षटकात ही गोष्ट घडली. ६४व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने अर्धशतक साजरे केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर रिषभ पंतनेही आपले अर्धशतक साजरे केले.

हा पाहा व्हिडीओ

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजअजिंक्य रहाणे