Join us

IND VS WI: भारताच्या तीन स्कोररच्या गाडीला अपघात

तिन्ही स्कोररवर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचे समजते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 16:49 IST

Open in App

राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याचे स्कोअरिंग करायला जाणाऱ्या तीन स्कोररच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातातून हे तिघेही बचावले आहेत. तिन्ही स्कोररवर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचे समजते.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे स्कोरिंग करण्यासाठी या तिन्ही व्यक्ती एका गाडीतून स्टेडियमच्या दिशेने जात होत्या. स्टेडियमला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि ते जखमी झाले.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज