India vs West Indies, 4th T20I Live Update : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणखी एक ट्वेंटी-२० मालिका जिंकली. वेस्ट इंडिजला चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात सपशेल शरणागती पत्करण्यास भाग पाडून भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर गोलंदाजांनीही कमाल केली. वेस्ट इंडिजचे फलंदाज सैरभैर झाल्यासारखे खेळले. कर्णधारपदाची धुरा पूर्णवेळ स्वीकारल्यानंतर रोहित शर्माचा हा ८ मालिका विजय आहे. अर्शदीप सिंगने तीन, तर रवी बिश्नोई, आवेश खान व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
रोहित शर्मा ( Rohit Sharma) व सूर्यकुमार यादव यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी ४.४ षटकांत फलकावर ५३ धावा चढवल्या. रोहित १६ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार खेचून ३३ धावांवर बाद झाला. पण, त्याने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. रोहितने ३३ धावांच्या खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या विक्रमात दुसरे स्थान पटकावले. ख्रिस गेल ५३३ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे. रोहितने आज ४७७ वा षटकार खेचून पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीचा ४७६ षटकारांचा विक्रम मोडला.
Rohit Sharma as a full-time captain for India:
- Beat New Zealand 3-0 in T20
- Beat West Indies 3-0 in ODI
- Beat West Indies 3-0 in T20
- Beat Sri Lanka 3-0 in T20
- Beat Sri Lanka 2-0 in Tests
- Beat England 2-1 in T20
- Beat England 2-1 in ODI
- Beat West Indies 3-1* in T20