Join us

IND vs WI 4th ODI : रोहित शर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने 162 धावांची खेळी साकारली. या सामन्यात रोहितने 20 चौकार आणि चार षटकार झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:15 IST

Open in App
ठळक मुद्देरोहितने आपल्या 162 धावांच्या खेळीत चार षटकार लगावताना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ज्याला आपण आदर्श मानला त्याचेच विक्रम मोडण्याचा मान भारताचा सलामीवीर रोहित शर्माला या सामन्यात मिळाला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने 162 धावांची खेळी साकारली. या सामन्यात रोहितने 20 चौकार आणि चार षटकार झळकावले.

हा पाहा शतकाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ

रोहितने आपल्या 162 धावांच्या खेळीत चार षटकार लगावताना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने आतापर्यंत 195 षटकार लगावले होते. रोहितचे या सामन्यापूर्वी 194 षटकार होते. या सामन्यात चार षटकार लगावत रोहितने सचिनला षटकारांच्या यादीत पिछाडीवर सोडले आहे. आता रोहितच्या नावावर 198 षटकार आहेत. या यादीत अव्वल स्थानावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे.

टॅग्स :रोहित शर्मासचिन तेंडुलकर