Join us

IND vs WI 4th ODI : क्रिकेट विश्वावर रोहितचीच 'सत्ता'

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहितने 137 चेंडूंत 20 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 162 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 21:49 IST

Open in App
ठळक मुद्देया खेळीनंतर क्रिकेट विश्वावर रोहितचीच 'सत्ता' असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात तडफदार दीडशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने 377 धावांचा डोंगर उभारला आणि वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवता आला. या खेळीनंतर क्रिकेट विश्वावर रोहितचीच 'सत्ता' असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहितने 137 चेंडूंत 20 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 162 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. या खेळादरम्यान रोहितने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 195 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. 

रोहितने दिडशेपेक्षा जास्त धावांची खेळी साकारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत यापूर्वीच अव्वल स्थान पटकावले होते. पण ही त्याची दिडशेपेक्षा जास्त धावा असेलली सातवी खेळी ठरली आहे. यापूर्वी सचिनने पाचवेळा दीडशेपेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

टॅग्स :रोहित शर्मासचिन तेंडुलकरभारत विरुद्ध वेस्ट इंडिज