India vs West Indies 3rd T20I Live Updates : वेस्ट इंडिजने २०१६ नंतर भारताला सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली आणि आज त्यांच्याकडे भारताची १७ वर्षांची मालिका विजयाची अपराजित मालिका खंडीत करण्याची संधी आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर आहे आणि आज त्यांना विजय मिळवून मालिकेतील आव्हान कायम राखण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी आज टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित आहेत.
इशान किशन व शुबमन गिल हे दोन्ही सामन्यांत काही प्रभाव पाडू शकले नाहीत. सूर्यकुमार यादव व संजू सॅमसन यांना संदीचं सोनं करता आले नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याचे टेंशन वाढलं आहे. अशात यशस्वी जैस्वालला संधी मिळण्याची संधी आहे. गोलंदाजीतही बदल होऊ शकतात. दुसऱ्या ट्वेंटी-२०त अक्षर पटेलला संधी मिळाली, परंतु हार्दिकने त्याच्याकडून एकही षटक टाकून घेतले नाही. कसोटी मालिकेत दमदार पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालला आज ट्वेंटी-२०त पदार्पणाची संधी दिली गेली आहे. कसोटी मालिकेत त्याने १७१ धावांच्या वैयक्तिक खेळीसह ३ इनिंग्जमध्ये २६६ धावा केल्या होत्या आणि अनेक विक्रम मोडले होते.