Join us  

IND vs WI, 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादव - वेंकटेश अय्यर जोडीने विंडीजची वाट लावली; सूर्याने ८ चेंडूंत ४६ धावा कुटल्या... 

India vs West Indies, 3rd T20I Live Updates : फलंदाजीच्या क्रमवारीत केलेले रोहित शर्माचे बदल आज फसले. ऋतुराज गायकवाडला आलेल्या अपयशानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 8:44 PM

Open in App

India vs West Indies, 3rd T20I Live Updates : फलंदाजीच्या क्रमवारीत केलेले रोहित शर्माचे बदल आज फसले. ऋतुराज गायकवाडला आलेल्या अपयशानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. पण, रोहितही अपयशी ठरला. मात्र, सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) या जोडीने चांगली फटकेबाजी केली. यादवने २७ चेंडूंत ट्वेंटी-२०ती चौथे अर्धशतक पूर्ण केले. यादवने अवघ्या ८ चेंडूंत ४६ धावा चोपल्या

रोहित शर्मा स्वतः सलामीला न येता ऋतुराज गायकवाड व इशान किशन यांना पाठवले. पण, अवघ्या १० धावांची त्यांची भागीदारी ठरली. त्यानंतरही रोहितने श्रेयस अय्यरला पुढे केले. इशान व अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, एकामागोमाग हे सेट फलंदाज बाद झाले.  ऋतुराजने चौकाराने खाते उघडले, परंतु अवघ्या ४ धावा करून तो माघारी परतला. इशान व अय्यरने ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. फॅबियनच्या गुगलीला अय्यर फसला अन् होल्डरच्या हाती झेल देऊन २५ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात रोस्टन चेसने भारताला आणखी एक धक्का दिला. इशान ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला आणि नॉन स्ट्राईकर रोहित त्याच्या शॉट सिलेक्शनवर नाराज दिसला. रोहित व सूर्यकुमार यादव यांनी षटकार खेचून वातावरण निर्मिती केली, परंतु डॉमिनिक ड्रॅक्सने भारताला झटका दिला. रोहित ७ धावांवर बाद झाला.

सूर्यकुमार आज वेगळ्याच मुडमध्ये होता आणि त्याने मारलेले सुरेख फटके चाहत्यांची दाद मिळवून गेले. वेंकटेश अय्यरची त्याला चांगली साथ मिळाली. रोहितची विकेट घेणाऱ्या ड्रॅक्सने टाकलेल्या १६व्या षटकात या दोघांनी १७ धावा कुटल्या. यादव व अय्यर तुफान फटकेबाजी करत होते आणि त्यांनी २६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्या विंडीजसमोर तगडे आव्हान उभे केले. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसूर्यकुमार अशोक यादवइशान किशनवेंकटेश अय्यर
Open in App