Join us

IND vs WI 3rd T20I Live Updates : ५ चेंडू खेळून रोहित शर्माने मैदान का सोडले?; BCCI ने महत्त्वाचे अपडेट्स दिले

India vs West Indies 3rd T20I Live Updates : अवघे ५ चेंडू खेळून कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) तंबूत का परतला याचे उत्तर सापडत नाही. काहींच्या मते त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आहे, पण, BCCI ने दिलेल्या अपडेट्समध्ये वेगळीच माहीती समोर आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 00:21 IST

Open in App

India vs West Indies 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर या जोडीने भारताची वाटचाल विजयाच्या दिशेने केली आहे. वेस्ट इंडिजच्या १६४ धावांचा पाठलाग करताना भारताने १० षटकांत १०२ धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने  अर्धशतकी खेळी करून विंडिजच्या गोलंदाजांना हैराण केले आहे. पण, या सामन्यात अवघे ५ चेंडू खेळून कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) तंबूत का परतला याचे उत्तर सापडत नाही. काहींच्या मते त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आहे, पण, BCCI ने दिलेल्या अपडेट्समध्ये वेगळीच माहीती समोर आली आहे. 

कायले मेयर्स व ब्रेंडन किंग्स ( २०) या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून प्रहार केला आणि ५७ धावांची भागीदारी केली. हार्दिक पाड्याने  पहिली विकेट घेतली व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५००+ धावा अन् ५० विकेट्स घेणारा हार्दिक पांड्या हा भारताचा पहिलाच, तर जगातला दहावा अष्टपैलू खेळाडू ठरला. मेयर्सने आर अश्विनचा चेंडू षटकार खेचून मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पांड्या व आर अश्विन चांगली गोलंदाजी करताना दिसले, परंतु आवेश खानला मेयर्सने टार्गेट केले. आवेशच्या तीन षटकांत विंडीजने ४७ धावा कुटल्या. 

भुवीने आणखी एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली. ५० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा करणाऱ्या मेयर्सला त्याने बाद केले.  शिमरोन हेटमायर व रोव्हमन पॉवेल यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. २०व्या षटकात अर्शदीप सिंगने सलग दोन चौकार खेचणाऱ्या रोव्हमन पॉवेलला तिसऱ्या चेंडूवर बाद केले. पॉवेलने १४ चेंडूंत २३ धावा केल्या. हेटमायरही १२ चेंडूंत २० धावा करून धावबाद झाला. विंडीजने ५ बाद १६४ धावा केल्या. 

वेस्ट इंडिजच्या १६४ धावांना प्रत्युत्तरात रोहित शर्माने ( Rohit Sharma) चांगली सुरुवात करून दिली. दुसऱ्या षटकात अल्झारी जोसेफला त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला, तर तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पण, पुढच्याच चेंडूवर बाद न होताच रोहितने मैदान सोडण्याच निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय भारताची धाकधुक वाढवणारा ठरला. त्याला नेमकं काय झालं हे अद्याप कळलं नसलं तरी त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रोहित ५ चेंडूंत ११ धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. रोहितच्या पाठीत उसणं भरली आहे आणि त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेऊन त्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयने सांगितले. उर्वरित दोन सामन्यांत तो खेळणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. 

श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताचा डाव सावरला. सूर्याने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने ट्वेंटी-२० क्रिकेटच्या २० डावांत आतापर्यंत ५ अर्धशतकं व १ शतक झळकावले आहे. सूर्या विंडीजच्या गोलंदाजांना चांगला कुटत होता. अय्यर सहाय्यक नायकाच्या भूमिकेत विकेट टिकवून सूर्याच्या फटकेबाजीचा आनंद लुटताना दिसला. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माबीसीसीआय
Open in App