Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND Vs WI 3rd One Day : 'या' गिफ्टमुळे चाहते म्हणायला लागले, कोहलीने अंपायरला 'चिक्की' दिली

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या सामन्यात असेच एक गिफ्ट भारताचा कर्णधार विराट कोहलीने पंचांना सामनाधिकाऱ्यांना दिले आणि त्याची जोरदार चर्चा झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 17:03 IST

Open in App
ठळक मुद्देकोहलीने सामना सुरु होण्यापूर्वी सामनाधिकाऱ्यांना एक गिफ्ट दिले आणि त्याची जोरदार चर्चा झाली.

पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : मैदानात पंचांचा निर्णय अखेरचा समजला जातो. पंच कोणाचीही बाजू न घेता आपला निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही खेळाडूने गिफ्ट दिले तर खसखस पिकायला सुरुवात होते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या सामन्यात असेच एक गिफ्ट भारताचा कर्णधार विराट कोहलीने पंचांना सामनाधिकाऱ्यांना दिले आणि त्याची जोरदार चर्चा झाली.

मैदानात कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट घडून नये, याची जबाबदारी पंचांवर असते. पण मैदानात कोणती वाईट गोष्ट घडली की पंच या गोष्टीची तक्रार सामनाधिकाऱ्यांना करतात. यावेळी कोणताही अधिकार घेण्याचा निर्णय सामनाधिकाऱ्यांना असतो. पण कोहलीने सामना सुरु होण्यापूर्वी सामनाधिकाऱ्यांना एक गिफ्ट दिले आणि त्याची जोरदार चर्चा झाली.

पाहा हा व्हिडीओ

कोहलीबरोबर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांचे अभिनंदन केले. ब्रॉड यांचा आजचा सामनाधिकारी म्हणून तिनशेवा सामना आहे. त्यामुळेच कोहलीने ब्रॉड यांना गिफ्ट दिल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज