ठळक मुद्देभारताला 43 धावांनी पराभव पत्करावा लागला.
पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावले. त्याचे हे या मालिकेतील तिसरे शतक ठरले, पण विराटच्या शतकांनंतरही भारताला पराभव कसा पत्करावा लागला? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर दिले आहे ते भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी 283 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 43 धावांनी पराभव पत्करावा लागला.
बुमराने पराभवाचे कारण यावेळी स्पष्ट केले आहे. तो म्हणाला की, " आमच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. पण अखेरचा काही षटकांमध्ये वेस्ट इंडिजने जास्त धावांची लूट केली. अखेरच्या 10 षटकांमध्ये त्यांनी 70 धावा फटकवल्या आणि या धावा त्यांच्या तळाचा खेळाडूंनी केल्या. माझ्यामते या धावा आम्हाला भारी पडल्या.