Join us

IND Vs WI 3rd One Day : धोनीने अफलातून झेल पकडत निवड समितीचे दात घातले घशात

कूल असलेल्या धोनीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात एक अफलातून झेल पकडत निवड समितीचे दात घशात टाकले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 14:16 IST

Open in App
ठळक मुद्देधोनीची ट्वेन्टी-20 कारकिर्द संपली अशी चर्चा आता रंगत आहे.

पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या ट्वेन्टी-20 संघातून महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आले. पण कूल असलेल्या धोनीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात एक अफलातून झेल पकडत निवड समितीचे दात घशात टाकले आहेत.

धोनीने पकडलेला सॉलीड कॅच पाहा

धोनीकधीही कोणत्या निर्णयावर आपली प्रतिक्रीया देत नाही. ट्वेन्टी-20 क्रिकेट संघातून त्याला वगळण्यात आले. पण धोनी शांत होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने एक कडक झेल पकडला आणि सलामीवीर हेमराजला माघारी धाडले. धोनीची ट्वेन्टी-20 कारकिर्द संपली अशी चर्चा आता रंगत आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज